Thursday, 22 December 2011

Solar Lamp

सूर्य दीप 

दोन चिमुकले दीप उजळले 
गणपतीच्या मंदिरी 
बघुनि तयांना मोदे भरले 
अनेक नरनारी.

दिवसा नव्हता प्रकाश त्यांचा 
पण सायंरात्री प्रकाश त्यांचा 
ना तेल, ना वाती, तरी उजळती 
गूढ काय हे सांगा तरी!

"दिवसा घेतो सूर्यप्रकाश 
उर्जा संकलनासाठी 
प्रकाशतो मग आम्ही रात्री 
उजळत उजळत तुमच्यासाठी 
तुमच्या आनंदासाठी."

1 comment: